Song Details:
Song: Othi Naav Bheem Gautmach Aee
Album: Bheemrath
Singer: Anand Shinde
Music: Harshad Shinde
Lyrics: Pratapsing Bodde
Music Label: T-Series
Othi Naav Bheem Gautmach Aee lyrics
राम नाम घेई कुणी हरी नाम घेई
राम नाम घेई कुणी हरी नाम घेई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। धृ ।।
कोंबड्याचीबांग येता क्षणी मी उठाव
न्हान धून झाल्यावर विहारात जावं
कोंबड्याचीबांग येता क्षणी मी उठाव
न्हान धून झाल्यावर विहारात जावं
न्हान धून झाल्यावर विहारात जावं
धरत्रीच्या निरवतेच
धरत्रीच्या निरवतेच झुंजू मुंजु होई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। १ ।।
रून झुन घुंगराची गळी चित्रबांच्या
रेखा कधी नक्षी नभी रांगा पाखरांच्या
रून झुन घुंगराची गळी चित्रबांच्या
रेखा कधी नक्षी नभी रांगा पाखरांच्या
रेखा कधी नक्षी नभी रांगा पाखरांच्या
वासराच्या साठी जेव्हा
वासराच्या साठी जेव्हा हंबरती गायी
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। २ ।।
कासराभर सूर्य येत शेताला मी जाते
थकून भागून जेव्हा सांजला मी येते
कासराभर सूर्य येत शेताला मी जाते
थकून भागून जेव्हा सांजला मी येते
थकून भागून जेव्हा सांजला मी येते
बुद्ध वंदनेने माझा
बुद्ध वंदनेने माझा क्षीण भाग जाई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। ३ ।।
अशी गोड गोड भीम गौतमाची गाणी
जीव तृप्त करी जणू रोहिणीचे पाणी
अशी गोड गोड भीम गौतमाची गाणी
जीव तृप्त करी जणू रोहिणीचे पाणी
जीव तृप्त करी जणू रोहिणीचे पाणी
प्रतापसिंग अकांतास
प्रतापसिंग अकांतास म्हणे दीक्षा ताई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। ४ ।।
राम नाम घेई कुणी हरी नाम घेई
राम नाम घेई कुणी हरी नाम घेई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई
माझ्या ओठी नाव भीम गौतमाचे येई।। धृ